Osho : ओशोंच्या पुण्यतिथीला माळेवरुन महाभारत! भक्तांचं आश्रमाबाहेर आंदोलन

lokmat.news18.com / pune
Osho Death anniversary : आचार्य रजनीश म्हणजेच ओशो यांच्या 33 व्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या पुण्यातील आश्रमाच्या बाहेरचं वातावरण चांगलंच तापलं होतं.
पुणे, 19 जानेवारी : आचार्य रजनीश म्हणजेच ओशो यांच्या 33 व्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या पुण्यातीलआश्रमाच्या बाहेरचं वातावरण चांगलंच तापलं होतं. ओशोंना अभिवादन करण्यासाठी आलेल्या भक्तांना समाधीस्थळी जाण्यास आश्रमाकडून रोखण्यात आलं. मुंबई उच्च न्यायालयानं ओशो भक्तांना दर्शन घेण्यापासून रोखता येणार नाही, असा निर्णय दिला होता. त्यानंतरही ओशो इंटरनॅशन फांऊडेशननं हा प्रवेश रोखल्याचा आरोप ओशोंचे भक्त स्वामी प्रेम प्रशांत यांनी केला.
ओशोंच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातील ओशो भक्त पुण्यात जमा झाले होते. त्यांना ओशोंनी दिलेली माळ घालून आश्रमात जाण्यास आश्रमाच्या व्यवस्थापनानं रोखल्याचा आरोप स्वामी प्रेम प्रशांत यांनी केला. या आश्रमात न्यू इयर फेस्टिव्हल, मान्सून फेस्टिव्हल होतो. पण, ओशोंशी संबंधित त्यांच्या जन्माचा आणि पुण्यतिथीचा फेस्टिव्हल होत नाही. ते कार्यक्रम देखील या आश्रमात व्हायला पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.
ओशोंनी 1989 साली केलेल्या एका वक्तव्याचा आधार देत आश्रम व्यस्थापकांनी आम्हाला प्रवेश दिला नाही. पण, ओशोंनी त्याबाबत 1989 पूर्वी आणि नंतरही वक्तव्य केलं आहे. माळ घालून आश्रमात प्रवेश करण्यात ओशोंनी परवानगी दिली होती, असा दावाही स्वामी प्रेम प्रशांत यांनी केला.